रजनीकांत मराठी बायोग्राफी |
Rajnikanth information in Marathi | रजनिकांत माहिती मराठीत
रजनीकांत हे नाव फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. रजनीकांत हे नाव घेताच त्यांची स्टाइल व ऍक्टिंग प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येते. भारतीय सिनेमासृष्टीत रजनीकांत हे एक खूप मोठे नाव आहे.
रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव गायकवाड पण त्यांना रजनीकांत या नावाने जास्त ओळखले जाते. अभिनेते रजनीकांत हे तमिल व हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात. त्यांचा अभिनय हा भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या या प्रसिद्धीच्या मागे त्यांचे खूप मोठे संघर्ष आहे. तर आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून त्यांची माहिती जाणून घेऊया.
Rajinikanth age, height biography and more | रजनीकांत बायोग्राफी मराठी
Rajinikanth biography |
---|
नाव - शिवाजी राव गायकवाड |
जन्म - 12 डिसेंबर 1950 जन्म स्थळ - बेंगलोर |
व्यवसाय - भारतीय अभिनेता |
राष्ट्रीय - भारतीय |
वय - 70 |
गृह नगर - बेंगलोर, कर्नाटक, भारत |
वडिलांचे नाव - रामोजीराव गायकवाड |
आईचं नाव - जिजाबाई गायकवाड |
भाऊ - सत्यनारायण राव, नागेश्वर राव |
पत्नी - लता |
Rajnikanth physical information |
---|
उंची - 5 फिट 8 इंच |
वजन - 73 kg |
शरीर रचना - छाती 40 इंच | कंबर 33 इंच |
डोळे - घारे |
केस - काळे |
Rajinikanth birthday & education | रजनीकांत जन्म आणि शिक्षण
अभिनेते रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 साली एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी झाला. रजनीकांत हे एका मराठी कुटुंबामध्ये जन्माला आले होते म्हणून त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवाजीराव असं ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव गायकवाड हे होते. ते एक पोलिस कॉन्स्टेबल होते. त्यांच्या आईचं नाव जिजाबाई होते व त्या एक गृहिणी होत्या. रजनीकांत जेव्हा पाच वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झाले. रजनीकांत यांना दोन मोठे भाऊ व एक बहीण आहे. रजनीकांत हे त्यांच्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. रजनीकांत यांचे कुटुंब प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील जेजुरी मधील मावळकडे या गावातील आहे.
रजनीकांत यांचे शालेय शिक्षण हे गावीपुरम गव्हर्नमेंट कन्नड मॉडर्न प्रायमरी स्कूल येथे झाले. रजनीकांत यांना अभ्यासामध्ये खूप चांगली रुची होती. त्याचबरोबर त्यांना शाळेमध्ये होणाऱ्या नाटकांमध्ये भाग घ्यायला खूप आवडायचे त्यामुळे त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याची एक आवड तयार झाली. रजनीकांत यांनी त्यांचं नंतर चे शिक्षण आचार्य पाठशाळा मधून पूर्ण केलं
Rajinikanth life struggle | रजनीकांत यांच्या जीवनातील संघर्ष
रजनीकांत यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची जिम्मेदारी ही त्यांच्यावर आली होती. त्यांनी बेंगलोर आणि मद्रास मध्ये आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी खूप सार्या नोकऱ्या केल्या. रजनीकांत हे सांगतात की त्यांनी कुली व कार्पेंटर चे देखील काम केले आहे. नंतर बेंगलोर ट्रान्सपोर्ट सर्विस मध्ये भरती निघाली. त्यामध्ये त्यांना घेण्यात आलं व ते एस. टी कंडक्टर चे काम करू लागले.
Rajnikant information in Marathi |
या नोकरीने त्यांना त्यांचे कुटुंब सांभाळण्यासाठी आर्थिक मदत होऊ लागली. पण रजनीकांत यांना नोकरी पेक्षा अभिनयाच्या क्षेत्रात जास्त रुची होती. रजनीकांत हे बसमध्ये देखील प्रवाशांना आपली कला व अभिनय दाखवून खुश ठेवत होते. ते तिकीट देखील त्यांच्या स्टाईल ने देत होते. त्यांच्या आतील असलेली ही कला प्रदर्शित करण्यासाठी ते नाटक व थेटरमध्ये भाग घेत होते.
Rajinikanth family | रजनीकांत परिवार
अभिनेते रजनीकांत यांनी 26 फेब्रुवारी 1981 साली "लता रंगचारी" यांच्याशी आंध्रप्रदेश येथील तिरुपती येथे विवाह केला. रजनीकांत व लता रंगाचारी यांचे रेलशनशिप तेव्हा सुरू होतं जेव्हा "लता रंगाचारी" या रजनीकांत यांचे इंटरव्यू घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा रजनीकांत यांना त्या आवडल्या व त्यांनी लता रंगचारी यांना प्रपोज केले. रजनीकांत व लता रंगाचारी यांना "ऐश्वर्या" व "सौंदर्य" या नावाच्या दोन मुली आहेत. रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या यांनी साउथ अभिनेता "धनुष" यांच्यासोबत 2004 सली विवाह केला. ऐश्वर्या व धनुष यांना दोन मुले आहेत. रजनीकांत यांची छोटी मुलगी सौंदर्य रजनीकांत या तमिल फिल्मी इंडस्ट्री मध्ये काम करतात. सौंदर्य या निर्माता, निर्देशक आणि ग्राफिक डिझाईनर आहेत.
Rajinikanth film career | रजनीकांत फिल्मी कारकीर्द
रजनीकांत यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची खूप आवड होती. यासाठी त्यांनी चित्रपट या क्षेत्रात काम करण्यासाठी मद्रास फिल्मी इन्स्टिटयूट येथे एक्टिंग मध्ये डिप्लोमा करण्यास गेले. या इन्स्टिट्यूटमधून त्यांनी फिल्मी करियर मध्ये पहिले पाऊल ठेवले. या इन्स्टिट्यूटमध्ये ते एक नाटक करत असताना त्यांची कला फिल्म निर्देशक बालाचंदर यांना आवडली. व त्यांनी रजनीकांत यांना त्यांच्या एका चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली. रजनीकांत हे निर्देशक बालाचंदर त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक होते.
या चित्रपटाचे नाव अपूर्व "रगंगल" हे होते. या चित्रपटात निर्देशक बालचंदर यांनी त्यांना "श्रीविद्या" यांच्या पतीचा छोटासा रोल दिला होता. या चित्रपटात मुख्य अभिनेते हे "कमल हसन" होते. या चित्रपटात रजनीकांत यांनी आपला अभिनय खूप छान पद्धतीने केला होता. रजनीकांत यांनी आपल्या कलेतून सगळ्यांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित केल होत. आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातिला रजनीकांत यांनी खूप चित्रपटांमध्ये कमला हसन यांच्या जोडीला काम केलं आहे. या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनयच्या रोल मध्ये कमला हसन व नेगेटिव्ह किंवा सहाय्यक रोल मध्ये रजनीकांत हे असायचे. पण त्यांच्या या अभिनयामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या खूप वाढली होती.
1978 या काळी रजनीकांत यांनी तब्बल वीस चित्रपटांमध्ये काम केले होते. यामध्ये तमिल, तेलगू आणि कन्नड अशा अलग-अलग भाषांचे हे चित्रपट होते. साल 1980 पर्यंत रजनीकांत हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मोठे सुपरस्टार झाले होते. अभिनेते रजनीकांत यांनी 'आत्तापर्यंत 180 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केल आहे'. त्यामध्ये तमिळ कन्नड, मालिया, हिंदी, बंगाली, इंग्लिश अशा भाषिक चित्रपटांचा समावेश आहे. रजनीकांत यांना आतापर्यंत खूप पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आल आहे.
Rajnikanth Awards | रजनीकांत यांना मिळालेले पुरस्कार
- 1984 साली रजनीकांत यांना बेस्ट तमिल ॲक्टर साठी पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. हा अवॉर्ड त्यांना "नल्लवमुख" या चित्रपटासाठी देण्यात आले होत.
- रजनीकांत यांना 2000 साली भारत पद्मभूषण अवॉर्ड्स देण्यात आले.
- 2007 साली N. d. T. V कडून रजनीकांत यांना इंडियन इंटरनेट ऑफ द इयर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले
- सन 2011 ला N. D. T. V ने मोस्ट स्टायलिस्ट एक्टर हा पुरस्कार दिला.
- सन 2016 ला रजनीकांत यांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आले.
- सन 1984 ला रजनीकांत यांना कलाईममनी अवार्ड देण्यात आले. त्यानंतर सन 1989 ला त्यांना एम.जी.आर अवॉर्ड देण्यात आले.
- सन 2007 ला महाराष्ट्र सरकार कडून रजनीकांत यांना "राज कपूर" अवार्ड देण्यात आले.
Rajnikanth life facts | रजनीकांत यांच्या जीवनातील रोचक तथ्य
- रजनीकांत यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही निगेटीव्ह व विलनच्या रोल पासुन केली होती.
- रजनीकांत यांचा पहिला हिंदी चित्रपट हा 1983 ला अमिताभ बच्चन व हेमामालिनी यांच्या सोबत होता. या चित्रपटाचे नाव हे अंधा कानून होते.
- रजनीकांत यांनी आपला सोशल मीडियावरील ट्विटर अकाउंट जेव्हा बनवला होता. तेव्हा चोवीस तासांमध्ये त्यांचे तब्बल दोन लाख दहा हजार फॉलोवर्स झाले होते.
- रजनीकांत हे सामाजिक कार्यांमध्ये नेहमी आर्थिक मदत करत असतात.
- रजनीकांत हे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे निर्दर्शक "बालचंदर" यांना आपला गुरू मानतात.
- रजनीकांत यांचे प्रेक्षक त्यांना "थलाइवा" या नावाने संबोधतात.
- रजनीकांत हे मराठी परिवारातील असून त्यांनी अजून पर्यंत एकही मराठी चित्रपट केलेला नाहीये.
- रजनीकांत यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवाजीराव हे नाव ठेवण्यात आले आहे.
आमच्या या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला सुपरस्टार रजनीकांत यांची माहिती आवडली असल्यास नक्की कमेंट करा.
Good
ReplyDelete